Amit Thackeray: राजकारणाच्या आखाड्यातून अमित ठाकरे फुटबॉलच्या मैदानात, शिवाजी पार्कवर मारले दमदार गोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 03:22 PM2021-08-21T15:22:22+5:302021-08-21T15:23:10+5:30

Amit Thackeray News: एरव्ही राजकीय मैदानात सभा आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून दिसणाऱ्या मनसेच्या अमित ठाकरे यांनी शिवाजीपार्क मैदानावर एका फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात मैदानात उतरून दमदार गोल मारत खेळाचा आनंद लुटला.

Amit Thackeray: Amit Thackeray from the arena of politics on the football field, scored a powerful goal at Shivaji Park | Amit Thackeray: राजकारणाच्या आखाड्यातून अमित ठाकरे फुटबॉलच्या मैदानात, शिवाजी पार्कवर मारले दमदार गोल

Amit Thackeray: राजकारणाच्या आखाड्यातून अमित ठाकरे फुटबॉलच्या मैदानात, शिवाजी पार्कवर मारले दमदार गोल

googlenewsNext

मुंबई :- एरव्ही राजकीय मैदानात सभा आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून दिसणाऱ्या मनसेच्याअमित ठाकरे यांनी शिवाजीपार्क मैदानावर एका फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात मैदानात उतरून दमदार गोल मारत खेळाचा आनंद लुटला.

दादर शिवाजीपार्क येथे आज  हौशी फुटबॉल संघाने मनसेच्या पुढाकारातून फुटबॉल सामान्यचे आयोजन केले होते या सामन्याचा शुभारंभ मनसेचे अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अमित ठाकरे स्वतः मौदानात उतरून स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब संघातून खेळत बांद्राच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब या प्रतिस्पर्धी संघावार दोन गोल करत यशस्वी खेळी केली.

मनसेच्या वतीने हौशी खेळाडूंसाठी दरवर्षी फुटबॉलच्या स्पर्धा खेळविण्यात येतात. मात्र कोरोनामुळे त्या घेता आल्या नव्हत्या. अमित ठाकरे यांना फुटबॉल खेळाची आवड आहे ते स्वतः मैदानात उतरल्यामुळे खेळाडूनचा उत्साह वाढला असे मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी लोकमतला सांगितले.
 

Web Title: Amit Thackeray: Amit Thackeray from the arena of politics on the football field, scored a powerful goal at Shivaji Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.