Join us

अमित शहा अचानक मुंबईत; मुख्यमंत्र्यांसोबत खलबते सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 23:05 IST

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण आणि पुण्यामध्ये हजारो कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन केले.

मुंबई : गेल्या आठवड्यात 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने महाराष्ट्रात भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या रात्रीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल झाले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण आणि पुण्यामध्ये हजारो कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन केले. यावेळी मोदी यांनी कल्याण आणि पुण्यातील मेट्रोच्या प्रकल्पांचे भूमीपूजन केले. यानंतर आज रात्रीच अमित शहा मुंबईत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमित शह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर खलबते सुरु आहेत. सत्तेत सहभागी असलेला शिवसेना पक्ष आणि त्यांच्याकडून होत असलेली टीका यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :अमित शाहदेवेंद्र फडणवीसआशीष शेलारभाजपा