Amit Shah: अमित शहा ५ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 08:33 IST2022-08-29T08:32:55+5:302022-08-29T08:33:26+5:30
Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येत असून लालबागच्या राजासह मुंबईतील महत्त्वाच्या सार्वजनिक गणपतींचे ते दर्शन घेणार आहेत.

Amit Shah: अमित शहा ५ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येत असून लालबागच्या राजासह मुंबईतील महत्त्वाच्या सार्वजनिक गणपतींचे ते दर्शन घेणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी जाऊनही अमित शहा गणपतीचे दर्शन घेणार आहेत.
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर आणि शिंदे-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अमित शहा यांचा हा पहिलाच दौरा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा दौरा होत असल्याने अमित शहा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.