आधीच अवकाळी, त्यात गारपिटीची भीती, मुंबईची हवेची गुणवत्ता सुधारली, थंडीचा कडाका वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 07:44 AM2023-11-26T07:44:59+5:302023-11-26T07:45:08+5:30

weather Update: मुंबईसह राज्यभरातील हवामान बदलामुळे पुढील दोन ते तीन दिवस बहुतांशी जिल्ह्यांना अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

Already unseasonal, fear of hail | आधीच अवकाळी, त्यात गारपिटीची भीती, मुंबईची हवेची गुणवत्ता सुधारली, थंडीचा कडाका वाढणार

आधीच अवकाळी, त्यात गारपिटीची भीती, मुंबईची हवेची गुणवत्ता सुधारली, थंडीचा कडाका वाढणार

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील हवामान बदलामुळे पुढील दोन ते तीन दिवस बहुतांशी जिल्ह्यांना अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे, तर गेल्या काही दिवसांपासून प्रदूषित झालेले वातावरण आता निवळले असून, हवेचा दर्जा समाधानकारक व मध्यम स्वरूपाचा नोंदविण्यात आला आहे.

विशेषत: दक्षिण मुंबईसह मध्य मुंबई व पूर्व-पश्चिम उपनगर धुळीने माखले होते. परंतु आता बहुतांशी परिसरातील हवेचा दर्जा सुधारला असून, तो समाधानकारक आणि मध्यम श्रेणीत नोंदविण्यात येत आहे.

Web Title: Already unseasonal, fear of hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.