अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण पोलिसांना भोवलं! उच्च न्यायालयाचे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By संतोष कनमुसे | Updated: April 7, 2025 15:27 IST2025-04-07T15:26:49+5:302025-04-07T15:27:38+5:30

Akshay Shinde Encounter Case : बदलापूर येथील अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दणका दिला आहे.

Akshay Shinde encounter case leaves police confused High Court orders to register a case against police | अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण पोलिसांना भोवलं! उच्च न्यायालयाचे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण पोलिसांना भोवलं! उच्च न्यायालयाचे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Akshay Shinde Encounter Case ( Marathi News ) :  बदलापूर येथील अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. हे एन्काऊंटर प्रकरण आता पोलिसांनाच भोवलं आहे. एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात शिंदेच्या वडिलांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयानेपोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. 

अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवर वडिलांनी प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. एन्काऊंटरमध्ये जे पोलीस अधिकारी उपस्थित होते, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. एन्काऊंटरवेळी जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मोठी बातमी! गर्भवती महिलेला योग्य ते उपचार दिले नाहीत, दीनानाथ रुग्णालय दोषी - महिला आयोग

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशावर वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली. असीम सरोदे म्हणाले, "अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस हे सॉफ्ट टारगेट आहेत. पोलिसांवर कोणी दबाव आणला, त्यांच्यावर दबाव आणून कोणी एन्काऊंटर करायला लावला? याची माहिती घ्यावी लागेल. याचे संदर्भ कुठे जातात त्यांची चौकशी करावी लागेल. त्यावेळी एन्काऊंटरचे फोटो काही नेत्यांनी लावले होते त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असंही वकील असीम सरोदे म्हणाले.  

नेमकं प्रकरण काय?

बदलापुरातील एका शाळेतील तीन चिमुकलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला होता. आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिस पथकावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली होती. आरोपीने पोलिस पथकावर गोळीबार केला, ज्यात पोलिस अधिकारीही जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला. पोलिसांचे पथक तळोजा कारागृहातून अक्षयला घेऊन जात असताना हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Akshay Shinde encounter case leaves police confused High Court orders to register a case against police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.