एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल विचारले, अजित पवारांनी हातच जोडले

By महेश गलांडे | Published: October 18, 2020 10:55 AM2020-10-18T10:55:23+5:302020-10-18T10:56:59+5:30

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. त्यामुळे खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशातील चर्चांना आणखी उधाण आले आहे

Ajit Pawar joined hands on the question of Eknath Khadse's admission in NCP | एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल विचारले, अजित पवारांनी हातच जोडले

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल विचारले, अजित पवारांनी हातच जोडले

Next
ठळक मुद्देएकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. त्यामुळे खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशातील चर्चांना आणखी उधाण आले आहे

मुंबई/सोलापूर : भाजपा नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा असून ते शनिवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, अद्याप त्यांच्या सीमोल्लंघनाबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी चक्का हात जोडून पत्रकारांना नमस्कार केला. तसेच, नेहमीप्रमाणे याबद्दल आपणास काहीच माहिती नसल्याचे पवार म्हणाले. 

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. त्यामुळे खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशातील चर्चांना आणखी उधाण आले आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर हत्याकांड प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख रावेरमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी रावेर येथील विश्रामगृहात अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली. ही भेट कोणत्या कारणसाठी झाली. याबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली. विशेष म्हणजे, विश्रामगृहावरून अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे एकाच गाडीने घटनास्थळी निघाले. त्यामुळे पुन्हा एकनाथ खडसेंच्या पक्षांतराबाबत तर्क-वितर्क सुरु झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर असून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते पाहणी करणार आहेत. तत्पूर्वी, पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांना एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, अजित पवारांनी चक्क हात जोडले. तसेच, मला याबद्दल काहीही माहिती नाही. ज्या गोष्टीची मला माहितीच नाही, त्याबद्दल मी तुम्हाला कसं काय सांगणार? असा प्रतिप्रश्नही अजित पवार यांनी केला. त्यामुळे, पत्रकारांमध्ये हशा पिकला. 

अजित पवारांचे यापूर्वीही हेच उत्तर 

राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळेबेरे समजू नये. तसेच एकनाथ खडसे यांच्या प्रवेश बद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे दिली. 

मोदींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशाचा कारभार चालवतात. मग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्राचा कारभार चालवला तर, विरोधकांनी मुख्यमंत्र्यावर टीका का करावी, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लगावला. शनिवारी पंढरपूर दौऱ्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

एकनाथ खडसे म्हणाले...

या विषयाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही. मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे मुहूर्त तुम्हीच म्हणजेच माध्यमांनी ठरविले आहेत, असे एकनाथ खडसे म्हणाले. शिवाय, त्यांनी रावेर तालुक्यातील घटनेवरून सरकारवर टीकाही केली.

Web Title: Ajit Pawar joined hands on the question of Eknath Khadse's admission in NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.