Join us  

अजित पवारही सत्तेत, फक्त देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं अयोग्य; राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 11:23 AM

आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

मुंबई-  गेल्या काही दिवसापासून अहमदनगरमधील पाटेगाव खंडाळा एमआयडीसी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार करत आहेत. या एमआयडीसीसाठी पवार यांनी पावसाळी अधिवेशनातही ही मागणी केली. यावरुन आता भाजप आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पवार यांनी या एमआयडीसीसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रावरुन आता रोम शिंदे यांनी एमआयडीसी हा विषय केंद्र सरकारचा आहे का? असा सवाल केला आहे, तर स्पर्धा परिक्षांच्या 'फी' वरुन पवार यांनी केलेल्या आरोपांवरही शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. 

तटकरेंनीच काढला होता व्हीप, एकटेच उरले; संसदेत मतदानावेळी नामुष्की

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील स्पर्धा परिक्षेच्या फी'वरुनही शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप केले आहेत. राज्यात तलाठी परिक्षेची फी १००० रुपये ठेवण्यात आली, या फीवरुन आमदार पवार यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केले होते. तसेच त्यांनी सोशल मीडियावरुनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत टीका केली आहे. 

आमदार राम शिंदे म्हणाले, परिक्षेच्या फीवरुन पवार देवेंद्र फडणवीसांवर बोलले. माझ्याआडून त्यांनी फडणवीस यांच्यावर आरोप करुन नये. वैयक्तीक टीका टीप्पणी करणं थांबवलं पाहिजे, सरकारमध्ये अजितदादा पवारही आहेत. म्हणजेच फी जास्त घेण्याच्या निर्णयात अजितदादा पवारही आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर वैयक्तिक टीका टीप्पणी करणं टाळलं पाहिजे, असंही आमदार शिंदे म्हणाले. 

'फी जास्त आहे हे बरोबर आहे, फी अधिक घेऊ नयेत यासाठी लोकांशी बोललं पाहिजे. फी साठी वैयक्तिक टीका टीप्पणी करणं टाळलं पाहिजे, असंही आमदार शिंदे म्हणाले.  

तसेच राम शिंदे यांनी पाटेगाव एमआयडीवरुनही पवार यांच्यावर आरोप केले. पाटेगाव खंडाळा येथेच एमआयडीसी व्हावी हा अट्टाहास रोहित पवार फक्त निरव मोदीची जमीन मिळवण्यासाठीच करत असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला. एमआयडीसीच्या जागेमध्ये निरव मोदी यांची जमीन कोणी समाविष्ट केली? कुणाच्या काळात समाविष्ट झाली? कुणी त्यांच्याशी संधान साधले? कोणाचे त्यांना कॉल झाले? याची सखोल चौकशी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लावली आहे, असंही राम शिंदे म्हणाले. 

टॅग्स :राम शिंदेरोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपादेवेंद्र फडणवीस