Join us

अजित पवार गटाचा संपूर्ण पक्षावर दावा; प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 06:16 IST

आता मी जयंत पाटील यांना जबाबदारीतून मुक्त करीत असल्याचे अधिकृतरीत्या कळविले आहे.

मुंबई : आम्हीच मूळ पक्ष असल्याचा दावा करीत अजित पवार गटाने राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांची हकालपट्टी केली असून, सुनील तटकरे यांना नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. जयंत पाटील यांची नियुक्ती आपल्या स्वाक्षरीने झाली होती. मी आता पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष आहे, पूर्वी उपाध्यक्ष होतो तेव्हा ही नियुक्ती केली होती. संघटनात्मक निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून ही नियुक्ती केली होती.

आता मी जयंत पाटील यांना जबाबदारीतून मुक्त करीत असल्याचे अधिकृतरीत्या कळविले आहे. तसेच त्यांच्या जागेवर सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करतो आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. त्यावेळी पटेल यांनी ही घोषणा केली.

खडसे यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्हया घडामोडींमुळे  ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भवितव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. काही वर्षांपूर्वी खडसेंनी २०२० मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देत, राष्ट्रवादी काँग्रेससोबत पाट लावला होता. 

टॅग्स :अजित पवारमहाराष्ट्र सरकारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार