Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 06:33 IST2025-06-15T06:32:32+5:302025-06-15T06:33:39+5:30

Mumbai Smuggling News: १.४१ कोटींचे सोने हस्तगत; डीआरआयची कारवाई

Air India crew member held for smuggling gold worth 1.41 crore | Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

मुंबई: केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी एअर इंडियाच्या न्यूयॉर्क ते मुंबई या विमानात केबिन कर्मचारी असलेल्या एका कर्मचाऱ्याला सोने तस्करीप्रकरणी अटक केली आहे. या कर्मचाऱ्याकडून एक हजार ३७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बार जप्त करण्यात आले असून, या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत एक कोटी ४१ लाख रुपये इतकी आहे, अशी माहिती ‘डीआरआय’कडून देण्यात आली. 

...अन् गुन्ह्याची दिली कबुली
सोन्याच्या तस्करीत संबंधित कर्मचारी गुंतला असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार एअर इंडियाच्या एआय-११६ या न्यूयॉर्क ते मुंबई या विमानाने हा कर्मचारी जेव्हा मुंबईत दाखल झाला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. प्रथम त्याने कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, त्याला सातत्याने प्रश्न विचारल्यानंतर त्याने सोने तस्करीची कबुली दिली.

मास्टरमाइंडही ताब्यात 
विमान कर्मचारी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांची श्वसन चाचणी केली जाते. त्या चाचणी परिसराजवळ त्याने काळ्या पाकिटामध्ये हे सोने लपवल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच, यापूर्वी देखील त्याने सोने तस्करी केल्याची कबुली अधिकाऱ्यांना दिली. या सोने तस्करीच्या मास्टरमाइंडची देखील माहिती त्याने अधिकाऱ्यांना दिली. या मास्टरमाइंडलाही ‘डीआरआय’ने ताब्यात घेतले आहे. संबंधित मास्टरमाइंड सोने तस्करीसाठी विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा वापर करत असल्याची कार्यपद्धती उजेडात आली आहे.

Web Title: Air India crew member held for smuggling gold worth 1.41 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.