मुंबई - केळवाणी संस्था संचालित मिठीबाई कॉलेज प्राचार्य डॉ.राजपाल हांडे यांच्यावर लैंगिक छळ केल्याबद्दल आरोप असूनही अटक केली नसल्याच्या विरोधात आणि प्राचार्य पदावरून हटविण्या बाबतच्या मागणीसाठी बोंब मारो आंदोलन करण्यात आलं. प्रहार विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी धरपकड करत ताब्यात घेऊन सोडून दिले. प्रहार विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या ४० कार्यकर्त्यांना आणि १० महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. प्रहार विद्यार्थी संघटना अध्यक्ष मनोज टेकाडे सरचिटणीस अजय तापकीर राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना अध्यक्ष अमोल मातेले यांना ताब्यात घेतले होते. महिला आयोगाच्या सचिव मंजुषा मोळवणे यांची भेट घेऊन भेट घेऊन त्यांना पत्र देखील देण्यात आले आहे. या पत्राद्वारे कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.
Video : मिठीबाई महाविद्यालयाबाहेर आंदोलन; पोलिसांची धरपकड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 16:52 IST
आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी धरपकड करत ताब्यात घेऊन सोडून दिले.
Video : मिठीबाई महाविद्यालयाबाहेर आंदोलन; पोलिसांची धरपकड
ठळक मुद्दे महिला आयोगाच्या सचिव मंजुषा मोळवणे यांची भेट घेऊन भेट घेऊन त्यांना पत्र देखील देण्यात आले आहे.या पत्राद्वारे कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.