टीक टीक वाजते डोक्यात... संजय राऊतांनंतर कुणाल कामराने घेतली सुप्रिया सुळेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 07:50 AM2020-10-13T07:50:38+5:302020-10-13T07:52:21+5:30

खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कुणालसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर, फेसबुक आणि ट्विटरवरुन या फोटोची चांगलीच चर्चा रंगली.

After Sanjay Raut, Kunal Kamra met Supriya Sule, photos viral on twitter | टीक टीक वाजते डोक्यात... संजय राऊतांनंतर कुणाल कामराने घेतली सुप्रिया सुळेंची भेट

टीक टीक वाजते डोक्यात... संजय राऊतांनंतर कुणाल कामराने घेतली सुप्रिया सुळेंची भेट

Next
ठळक मुद्देकुणाल कामराच्या ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टमधील संजय राऊत यांची बहुचर्चित मुलाखत अखेर पार पडली आहे. खार येथील ‘द हॅबिटेट’ स्टुडिओत रविवारी संध्याकाळी या मुलाखतीचे चित्रीकरण झाले.

मुंबई - स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान, संजय राऊत यांची शटअप या कुणाल या पॉडकास्टमधील मुलाखतही पार पडली आहे. या मुलाखतीवेळी कुणाले खेळण्यातील जेसीबी देऊन राऊत यांचे स्वागत केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर, आता कुणाल कामराने खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली आहे. 

खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कुणालसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर, फेसबुक आणि ट्विटरवरुन या फोटोची चांगलीच चर्चा रंगली. अनेकांनी या फोटोवरुन कंगनाला ट्रोल केले असून नेटीझन्सला या मुलाखतीची उत्सुकता लागली आहे. आता, कुणाल कामराने खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे, कुणालने सुप्रिया सुळेंचीही मुलाखत घेतलीय का? असा प्रश्न अनेकांना पडलाय. खासदार सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचा फोटो शेअर करत, विथ कुणाल कामरा असं लिहलं आहे. त्यामुळे, आता सुप्रिया सुळे आणि कुणाल कामरा यांची भेटही चर्चेचा विषय ठरणार हे नक्की.  

मुलाखतीची उत्सुकता

कुणाल कामराच्या ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टमधील संजय राऊत यांची बहुचर्चित मुलाखत अखेर पार पडली आहे. खार येथील ‘द हॅबिटेट’ स्टुडिओत रविवारी संध्याकाळी या मुलाखतीचे चित्रीकरण झाले. कुणालने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर पोस्ट टाकून संजय राऊत यांची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यास, संजय राऊतदेखील मुलाखत देण्यासाठी राजी झाले होते. या मुलाखतीपूर्वी संजय राऊत आणि कुणाल कामराची भेटही झाली होती. कुणालने घेतलेल्या मुलाखतीत सुंशांतप्रकरण आणि कंगना-शिवसेना वाद केंद्रस्थानी होता. तर, राज्य ते देशाच्या राजकारणातील घडामोडी, मोदी सरकार ते महाविकासआघाडी सरकार, राज्यातील कोरोनाची स्थिती, कन्हैया कुमार ते मनसे या मुद्द्यांवर प्रश्नोत्तरे रंगली. मुलाखतीमधील बुलडोझर हे प्रॉप म्हणून ठेवण्यात आले होते, सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे, आता ही मुलाखत कधी प्रसारित होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुलाखतीची सोशल मीडियावर होते चर्चा

‘शट अप या कुणाल’ या पॉडकस्ट कार्यक्रमाचा सोशल मीडियावर चाहतावर्ग आहे. कुणाल कामरा याच्याकडून थेट, उपरोधिक आणि मजेशीर शैलीत विचारले जाणारे प्रश्न या कार्यक्रमाचे आकर्षण असते. त्यामुळे कुणाल कामराचे थेट प्रश्न आणि संजय राऊत यांची बेधडक उत्तरे हा सामना कसा रंगणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती.

दिग्गजांच्या घेतल्या मुलाखती

कुणालने यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेस नेते मिलिंद देवरा, खासदार तेजस्वी सूर्या, शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी, जेएनयू विद्यार्थी नेते कन्हैया कुमार, उमर खलिद, एमआयएम खासदार असदुद्दीन औवेसी, गीतकार जावेद अख्तर यांच्यासह अनेकांच्या मुलाखती घेतल्या असून इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे. 

Web Title: After Sanjay Raut, Kunal Kamra met Supriya Sule, photos viral on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.