Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेंना काकांचा 'मनसे' पाठिंबा; आज भरणार उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 08:55 AM2019-10-03T08:55:59+5:302019-10-03T09:12:24+5:30

Worli Vidhan Sabha Election : मनसेनं जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीतही राज ठाकरेंनी वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही.

Aditya Thackeray to contest Assembly polls form Worli | Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेंना काकांचा 'मनसे' पाठिंबा; आज भरणार उमेदवारी अर्ज

Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेंना काकांचा 'मनसे' पाठिंबा; आज भरणार उमेदवारी अर्ज

Next

मुंबईः ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरत असून, मनसेनं जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीतही राज ठाकरेंनी वरळीतूनआदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे राज ठाकरे वरळीत मनसेचा उमेदवार न देऊन आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्षरीत्या मदत करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर आदित्य ठाकरे आज उमेदवारी अर्ज भरणार असून, पदयात्रा काढणार आहेत. अर्ज भरताना आदित्य ठाकरे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

मनसेनं पहिली 27 उमेदवार आणि दुसरी 54 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात वरळीतून अद्यापही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हयातील एकही निवडणूक लढवली नव्हती. परंतु महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल कायम त्यांच्या हातात असे. परंतु कालपरत्वे सगळंच बदलत गेलं, आता ठाकरे घराण्यातील चौथ्या पिढीतील व्यक्ती सक्रिय राजकारणात प्रवेश करत आहे. युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी राजकारणाला सुरुवात केली अन् अल्पावधीतच त्यांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं. 

ठाकरे घराण्यात किती मतभेद असले तरी कठीण प्रसंगात ते एकत्र येत असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना राज ठाकरेंनी लीलावती रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली होती. उद्धव ठाकरेंवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरेंनी स्वतः गाडी चालवून उद्धव यांना मातोश्रीवर नेले होते. तसेच राज ठाकरेंच्या मुलाच्या लग्नाच्या वेळीसुद्धा उद्धव ठाकरेंच्या कुटुंबीयांनी उपस्थिती दर्शवली होती. राज ठाकरेंवर कोहिनूर मिल प्रकरणात ईडीकडून करण्यात आलेल्या चौकशीच्या वेळीही उद्धव ठाकरेंनी चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही, असं म्हटलं होतं. राज ठाकरेंनी मनसेच्या दुसऱ्या यादीतही वरळीतून उमेदवार न दिल्यानं आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्षरीत्या मदत करणार असल्याचीच चर्चा आहे.  

Web Title: Aditya Thackeray to contest Assembly polls form Worli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.