अदानीचे वीज बिल भरण्यास जनतेला मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 14:30 IST2018-10-25T14:30:38+5:302018-10-25T14:30:59+5:30
रिलायन्स एनर्जीकडून मुंबई उपनगरात वीज पुरवठा करण्याचे काम अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपनीने घेतले आहे.

अदानीचे वीज बिल भरण्यास जनतेला मनस्ताप
मुंबई : रिलायन्स एनर्जीकडून मुंबई उपनगरात वीज पुरवठा करण्याचे काम अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपनीने घेतले आहे. मात्र, या अदलाबदलीत विजेचे बिल ऑनलाइन भरण्यासाठी ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पूर्वी रिलायन्सच्या वेबसाईटवर बिल भरता येत होते. मात्र, अदानीकडे हे काम सप्टेंबर 2018 मध्ये आले, तेव्हापासून आजपर्यंत ऑनलाइन बिल भरण्याची व्यवस्था अदानीकडून सुरळीत झालेली नाही. याबाबत अदानीच्या वीज बिल केंद्रात विचारणा केली तर आणखी 1 महिना लागेल, अशी उत्तरे मिळत आहेत.
यामुळे नागरिकांना विजेची बिले भरण्यासाठी लोकांना वीज बिल भरणा केंद्रात रांगा लावाव्या लागत आहेत.