Actor Satish Shah defeats Corona in eight days; Discharged from the hospital | अभिनेते सतीश शाहांची आठ दिवसांत कोरोनावर मात; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

अभिनेते सतीश शाहांची आठ दिवसांत कोरोनावर मात; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

ठळक मुद्देबिग बी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक आणि आराध्या यांना कोरोनाची लागण झाली होती.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना आता बॉलिवूड मंडळी सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. बॉलिवूड अभिनेते सतीश शाह यांना देखील करोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी अवघ्या आठ दिवसांत कोरोवार मात केली. उपचारानंतर सतीश शाह यांना रुग्णालयातून २८ जूनला डिस्चार्ज मिळाला. दरम्यान, बिग बी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक आणि आराध्या यांना कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनावर मात केल्यानंतर सतीश शाह यांनी रविवारी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. तसेच, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या आजाराविषयी सांगितले. सतीश शाह म्हणाले, "मला काही दिवस सतत ताप येत होता. माझ्या शरीराचे तापमान ९९ ते १०० डिग्रीच्या आसपास होते. त्यावेळी  मी काही औषधं घेऊन बरा होण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, ताप कमी होत नव्हता. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कोरोनाची चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली." 

कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सतीश शाह हे लगेच रुग्णालयात दाखल झाले. ते म्हणाले, "मी २० जूनला लिलावती  रुग्णालयात भरती झालो. तिथे माझ्यावर योग्य उपचार केले गेले. परिणामी आठच दिवसात मी बरा झालो. आता मी घरी परतलेलो असलो तरी देखील डॉक्टरांनी मला काही दिवस क्वारंटाइनमध्येच राहण्याचा सल्ला दिला आहे."

दरम्यान, कोरोना व्हायरसचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. जगभरातील कोरनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली असून तब्बल सहा लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actor Satish Shah defeats Corona in eight days; Discharged from the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.