दीड हजार दांडी बहाद्दरांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 06:59 AM2019-03-31T06:59:42+5:302019-03-31T07:00:09+5:30

गैरहजेरी भोवणार । २१ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

Action taken by the Election Commission for one and a half thousand Dandi Bahadar | दीड हजार दांडी बहाद्दरांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई

दीड हजार दांडी बहाद्दरांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई

Next

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी २१ हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त केल्याची माहिती निवासी उपजिल्हा अधिकारी व कर्मचारी नियुक्ती विभागाचे समन्वयक संपत डावखर यांनी दिली आहे. याउलट निवडणूक कामास दांडी मारणाऱ्या सुमारे दीड हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डावखर यांनी सांगितले की, निवडणूक पारदर्शी, नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. मतदान केंद्रावरील कर्मचारी व अधिकाऱ्यांपासून ते निवडणूकविषयक यंत्रणा हाताळणारे सर्व विभागांचे वेगवेगळे अधिकारी व कर्मचारी मिळून सुमारे २१ हजार कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मतदान केंद्राध्यक्ष व प्रथम मतदान अधिकारी प्रत्येकी ३ हजार १६२, इतर मतदान अधिकारी ६ हजार ३२४, क्षेत्रीय अधिकारी ४५०, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी २ हजार ६०० यांसह ४ हजार शिपाई यांचा समावेश आहे. या सर्वांना सहकार्य करण्यासाठी १ हजार २०० कार्यालयीन कर्मचाºयांची विधानसभा मतदारसंघनिहाय नेमणूक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

काहींवर कारवाई; काहींना सूट
निवडणुकीचे काम हे अतिशय महत्त्वाचे असून या कामात गैरहजर राहणाºया कर्मचारी व अधिकाºयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. प्रथम प्रशिक्षणाला अनुपस्थित असलेल्या जवळपास दीड हजार अधिकारी व कर्मचाºयांविरुद्ध कारवाई प्रस्तावित केली आहे. याशिवाय संबंधितांच्या वास्तववादी अथवा निकडीची गरज लक्षात घेता काही अधिकारी व कर्मचाºयांना निवडणुकीच्या कामातून सूट दिल्याचे डावखर यांनी सांगितले.

पाच केंद्रीय निवडणूक निरीक्षक नियुक्त
च्मुंबई शहर जिल्ह्यासाठी निवडणूक आयोगाने पाच केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. लवकरच संबंधित निरीक्षक मतदारसंघात भेटी देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली. ते म्हणाले की, सर्वसामान्य केंद्रीय निरीक्षक म्हणून संजय प्रसाद व शिल्पा गुप्ता, तर पोलीस खात्यासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून दीपक पुरोहित यांची नियुक्ती झाली आहे. तसेच निवडणूक खर्चाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून अभिषेक शर्मा व संतोष कुमार करनानी यांना आयोगाने नियुक्त केलेले आहे.
च्दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर संजय प्रसाद, तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर शिल्पा गुप्ता यांची करडी नजर असेल. याउलट दीपक पुरोहित यांच्याकडे दोन्ही मतदारसंघांची जबाबदारी असेल. संतोषकुमार करनानी दक्षिण मुंबई, तर अभिषेक शर्मा यांच्याकडे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Web Title: Action taken by the Election Commission for one and a half thousand Dandi Bahadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.