मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:00 IST2025-06-17T13:41:03+5:302025-06-17T14:00:28+5:30

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली

Accused of sexually harassing hundreds of girls through AI arrested Photos of 13000 girls found in mobile phone | मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का

मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का

Mumbai Crime News: तंत्रज्ञानाचा वापर करुन शेकडो मुलींचा छळ करणाऱ्या विकृताला मुंबईत अटक करण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन हा तरुण मुलींचा छळ करत होता. त्याचे न ऐकल्यास  अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर तरुणींची बदनामी करत होता. पोलिसांनी तक्रारी मिळाल्यानंतर आरोपींला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या मोबाईलमध्ये तब्बल १३ हजार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन तयार केलेले अश्लील फोटो सापडले आहेत. या आरोपीने आणखी किती तरुणींचा छळ केला आहे याचा पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे आता अशाप्रकारे सोशल मीडियावर आपली वैयक्तित माहिती पोस्ट करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

इन्स्टाग्रामवर मैत्री करून नंतर एका तरुणाकडून अश्लील फोटोंच्या आधारे ब्लॅकमेलिंग सुरु असल्याची तक्रार एका तरुणीने दहिसर पोलिसांकडे केली होती. आरोपी हा तरुणीशी मैत्री केल्यानंतर तिला न्यूड व्हिडियो कॉल करण्यासाठी दबाव टाकायचा. पीडित तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन तिचे अश्लील फोटो तयार केले आणि फेक इन्स्टाग्राम पेजवरुन पोस्ट केले. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि गुगलकडून त्या अकाऊंटविषयी माहिती मागवली. पोलिसांना आयपी ॲड्रेस मिळाल्यानंतर त्यांनी तांत्रिक तपास करत आरोपीला शोधून काढले.

दहिसर पोलिसांनी कर्नाटकमधील बेल्लारी जिल्हातील सांदूरमधून शुभम कुमार मनोजप्रसाद सिंग (२५) याला अटक केली. शुभम हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. दिल्ली येथे त्याने कॉम्प्युटरचे खास प्रशिक्षण घेतलं होतं. त्याचा वापर त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर फोटो तयार करण्यासाठी केला. एआयवर स्वतःचे आकर्षक फोटो तयार करुन तो मुलींना इन्स्टाग्राम, फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवायचा. मुलींनी रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर आरोपी शुभम त्यांच्या अकाऊंटमधल्या फोटोचे एआय फोटो तयार करायचा. त्यानंतर तो मुलींना न्यूड व्हिडीओ कॉल करायला सांगायचा. तसे करण्यास नकार दिल्यावर आरोपी फेक अकाऊंटवरुन ते फोटो बदनामीकारक मजकूरासह पोस्ट करायचा. पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये तब्बत १३ हजार ५०० असे फोटो सापडले आहेत. त्यामुळे हे प्रकरण मोठे असण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभमच्या मोबाईलमध्ये मुलींच्या नावाचे १०० हून अधिक फेक इन्स्टाग्राम आयडी सापडले आहेत. त्याच्या मोबाईल गॅलरीमध्ये १३ हजार ५०० मुलींचे वेगवेगळे फोटो सापडले आहेत. तो सध्या ५० पेक्षा जास्त मुलींशी बोलत होता. त्यामुळे पीडित मुलींनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 

Web Title: Accused of sexually harassing hundreds of girls through AI arrested Photos of 13000 girls found in mobile phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.