मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरजवळ अपघात, पत्नी जागीच ठार, पती गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 05:17 IST2018-09-09T05:17:29+5:302018-09-09T05:17:42+5:30
मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर हद्दीत दुचाकीला कंटेनरने ठोकर देऊन दुचाकी घसरून शनिवारी झालेल्या अपघातात उषा रामदास हाडप (५२) यांच्या अंगावरून कंटेनर गेल्यामुळे त्या जागीच ठार झाल्या

मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरजवळ अपघात, पत्नी जागीच ठार, पती गंभीर जखमी
वावोशी : मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर हद्दीत दुचाकीला कंटेनरने ठोकर देऊन दुचाकी घसरून शनिवारी झालेल्या अपघातात उषा रामदास हाडप (५२) यांच्या अंगावरून कंटेनर गेल्यामुळे त्या जागीच ठार झाल्या तर त्यांचे पती रामदास हाडप (६0, रा.नावंढे) हे अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खोपोलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रामदास हे शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता आपल्या दुचाकीवरून आपली पत्नी उषा यांच्यासह खोपोलीहून नावंढे गावाकडे निघाले होते. खालापूर हद्दीत हाळ गावानजीक मालवणी हॉटेलसमोर पाठीमागून येणाऱ्या कंटेनरची धडक बसून दुचाकी घसरून खाली पडली. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या उषा कंटेनरच्या खाली आल्यामुळे जागीच ठार झाल्या. अपघातानंतर कंटेनर चालकाने कंटेनरसह घटनास्थळावरून पळ काढला. उषा यांच्या मृतदेहाचे खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.