Join us

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 22:30 IST

मुंबई महापालिकेजवळ हा अपघात झाला, सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही.

मुंबई: महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.  एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा अपघात झाला. मुंबई महापालिकेजवळ झालेल्या या अपघातात वाहनांचे किरकोळ नुकसान झाले, पण सुदैवाने यात कोणालाही हानी झाली नाही. मुख्यमंत्रीदेखील सुरक्षित आहेत.

स्वातंत्रवीर सावरकर स्मारकाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पावसाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाकडे जात होते. यावेळी पालिकेच्या मुख्यालयाजवळ त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला. ताफ्यातील एका कारने पुढच्या कारला मागू जोरदार धडक दिली. पुढची कार अचानक थांबल्याने मागची कार आदळली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशाराराज्यात पश्चिम किनारपट्टीवर गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबई शहर आणि उपनगर पट्ट्यातही सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. यातच पुढील तीन ते चार तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगर भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आलं आहे.  

टॅग्स :एकनाथ शिंदेभाजपाशिवसेनाअपघात