Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 22:48 IST2025-12-29T22:47:20+5:302025-12-29T22:48:41+5:30
Mumbai Bhandup Best Bus Accident: भांडुप स्टेशन रोड परिसरात बेस्ट बसला अपघात घडला. या अपघातात चार जण ठार झाले आहेत.

Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
मुंबईतील भांडुप पश्चिम परिसरात सोमवारी रात्री बेस्ट बसचा थरार पाहायला मिळाला. स्टेशन रोड परिसरात बस रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने प्रवाशांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार जण ठार झाले. तर, नऊ जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, सोमवारी रात्री सुमारे १०.०५ वाजताच्या सुमारास भांडुप स्टेशन रोड परिसरात ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, बेस्टचे वरिष्ठ कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित बेस्ट चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर, जखमींमध्ये एकं महिला आणि ८ पुरुषांचा समावेश आहे.