गुन्हा करून वर्षानुवर्षे फरार; अखेर गुन्हेगार होतोच गजाआड!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 10:04 AM2024-01-23T10:04:00+5:302024-01-23T10:04:44+5:30

‘कानून के हाथ लंबे होते है’, गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात यश.

Absconding for years after committing a crime after that the criminal becomes a wanted | गुन्हा करून वर्षानुवर्षे फरार; अखेर गुन्हेगार होतोच गजाआड!

गुन्हा करून वर्षानुवर्षे फरार; अखेर गुन्हेगार होतोच गजाआड!

मुंबई : विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करून धुडगूस घालून वाँटेड, फरार राहण्याचा प्रयत्न सराईत आरोपी करतात; मात्र अनेक दशकांपासून पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या गुन्हेगारांना गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळतेच. उगाचच नाही म्हणत  की ‘कानून के हाथ लंबे होते है’ असे म्हणतात. 

गुन्हा करून पसार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मोठी मदत होते; तसेच आजही सक्रिय असलेले खबऱ्यांचे नेटवर्क वापरत डिलिव्हरी बॉय, भाजीवाला, रिक्षावाला, टॅक्सीवाला, अगदी बुरखाधारी असे वेशांतर करून आरोपीच्या मुसक्या आवळल्याचेही प्रकार आहेत. कुरार पोलिसांच्या हद्दीत प्रेयसीचे लग्न दुसऱ्याशी लावल्याच्या रागात तिच्या आई-वडिलांना जिवंत जाळण्यात आले. 

पोलिस मागावर असतातच :

बऱ्याचदा एखादा गुन्हा करून वेशांतर करणे,स्वतःच्या ठिकाणे बदलणे, ओळख लपवण्यासारख्या युक्त्या वापरत पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न आरोपी करतात; मात्र पोलिस हे तांत्रिक; खबऱ्यांच्या नेटवर्कमार्फत त्यांच्या मागावर आहेत हे विसरतात.

खटला बंद, आरोपी जिवंत :

कागदोपत्री मृत्यू झाला असे समजून खटला बंद केला. वाँटेड आरोपी दीपक नारायण भिसे  (६२) ला २० वर्षांनी नालासोपारा परिसरातून कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर हत्या, मारामारी असे अनेक गुन्हे दाखल होते.

या दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपी यशवंत बाबुराव शिंदे (२२) ला कोंडवामधून २२ वर्षांनी अटक करण्यात आली.

रेकॉर्ड एका क्लिकवर :

महाराष्ट्र पोलिसांच्या सीसीटीएनएस (गुन्हे आणि गुन्हेगारी ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली)मुळे गुन्ह्याचा तपास, डेटा विश्लेषण, संशोधन, धोरण तयार करणे आणि तक्रारींचा अहवाल देणे आणि ट्रॅक करणे सोपे झाले आहे. एका सामायिक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरअंतर्गत जोडण्यात आल्याने अभिलेखावरील गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

सोन्याच्या दाताने केला घात :

 दादरमध्ये कपड्याच्या दुकानात प्रवीण जडेजा हा सेल्समन म्हणून काम करायचा. 

 त्याने मालकाचे ४० हजार रुपये चोरी झाल्याचा बनाव करीत लुटले. 

 हा बनाव उघड झाल्यानंतर पेहरावात बदल करून १५ वर्षे फरार झालेल्या जडेजाला त्याच्या सोन्याच्या दातावरून ओळख पटवत आरएके मार्ग पोलिसांनी १५ वर्षांनी अटक केली.

Web Title: Absconding for years after committing a crime after that the criminal becomes a wanted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.