‘मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार’: आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:35 IST2026-03-25T11:35:53+5:302026-03-25T11:35:53+5:30

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘श्यामची आई’ या चित्रपटास ७९ लाखांचा निधी वितरित करण्यात आला.

a separate cinema hall for Marathi will soon be set up in Mumbai said ashish shelar | ‘मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार’: आशिष शेलार

‘मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार’: आशिष शेलार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शहरात मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्ये टप्प्याटप्प्याने मराठी चित्रपटगृहांचे जतन आणि विकास करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. 

सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित दर्जेदार चित्रपटांना अर्थसाहाय्य योजनेचा धनादेश वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसाहाय्य योजनेंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण केलेल्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील ६५ चित्रपट आणि कोविड काळातील ९८ चित्रपटांना एकूण २४ कोटी १० लाख अर्थसाहाय्य मंगळवारी वितरित करण्यात आले.  सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर व विविध चित्रपटांचे निर्माते यावेळी उपस्थित होते. 

७९ लाखांचा निधी

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘श्यामची आई’ या चित्रपटास ७९ लाखांचा निधी वितरित करण्यात आला. तसेच अपर्णा हौसिंग, शीतल शेट्टी, स्नेहल तरडे या दिग्दर्शक महिलांना प्रत्येकी ५ लाख प्रोत्साहन निधी देऊन गौरविण्यात आले. मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, दर्जेदार मराठी सिनेमा निर्माण व्हावे, यासाठी सरकार काम करत आहे.
 

Web Title : मुंबई में जल्द ही मराठी के लिए स्वतंत्र चित्रनाट्यगृह: आशीष शेलार

Web Summary : मुंबई में जल्द ही मराठी के लिए एक समर्पित चित्रनाट्यगृह होगा। सरकार महाराष्ट्र भर में मराठी सिनेमाघरों का संरक्षण और विकास करेगी। गुणवत्तापूर्ण मराठी सिनेमा को बढ़ावा देने के लिए योग्य मराठी फिल्मों को वित्तीय सहायता वितरित की गई और महिला निर्देशकों को सम्मानित किया गया।

Web Title : Mumbai to get independent Marathi cinema hall soon: Ashish Shelar

Web Summary : Mumbai will soon have a dedicated Marathi cinema hall. The government will preserve and develop Marathi cinema halls across Maharashtra. Financial assistance was distributed to deserving Marathi films, and women directors were honored to promote quality Marathi cinema.