फडणवीसांना धमकाविणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 10:05 IST2024-03-03T10:04:56+5:302024-03-03T10:05:42+5:30

किंचक नवले याला न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती परिमंडळ ९चे पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन  यांनी दिली.

a man Arrested for threatening Fadnavis | फडणवीसांना धमकाविणारा अटकेत

फडणवीसांना धमकाविणारा अटकेत

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका स्थानिक वाहिनीवरील मुलाखतीतून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला सांताक्रूझ पोलिसांनी अखेर अटक केली आहे. त्याचे नाव किंचक नवले (३४) असून, साताऱ्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सांताक्रूझ पोलिसांनी नवले याचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता तो साताऱ्याच्या हद्दीत असलेल्या ‘हॉटेल सेव्हन ११’ येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने नवले याचा गाशा गुंडाळला. किंचक नवले याला न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती परिमंडळ ९चे पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी दिली.
 

Web Title: a man Arrested for threatening Fadnavis