CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 22:02 IST2024-10-18T22:01:34+5:302024-10-18T22:02:08+5:30
Mumbai Local Train Update: कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा रुळावरून घसल्याची घटना शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) रात्री घडली. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
अनिकेत घमंडी
डोंबिवली: कल्याणरेल्वे स्थानकात रात्री ८: ५५ वाजता मुंबईला जाणाऱ्या लोकलचा शेवटचा डबा घसरल्याची घटना नऊ वाजता घडली. त्यामुळे फलाट दोन वर जाणाऱ्या लोकलचा गोंधळ।झाला.
ही घटना घडल्याने रात्री डाऊन मार्गावर जाणाऱ्या तसेच अप मार्गावरून येणाऱ्या लोकलचा गोंधळ उडाला. जी लोकल मुंबईकडे जाणार होती, त्यातील प्रवासी उतरून लगेच फलाट चार वर गेले आणि त्यांनी दुसरी लोकल पकडून ते पुढे गेले.
कल्याणरेल्वे स्थानकात रात्री ८: ५५ वाजता मुंबईला जाणाऱ्या लोकलचा शेवटचा डबा घसरल्याची घटना नऊ वाजता घडली.#mumbailocaltrain#mumbailocal#mumbaipic.twitter.com/S0T7VJfAi2
— Lokmat (@lokmat) October 18, 2024
खडवली, आसनगाव, टिटवाळा दिशेकडून येणाऱ्या लोकलचा त्यामुळे खोलंबा झाला होता. फलाटात ही घटना घडल्याने अन्य मार्गावरील सर्व रेल्वेसेवा सुरू होती.
गाडीचा डबा रुळावर आणण्यासाठी ट्रॅक देखभाल करणारे कर्मचारी घटनास्थळी गेले होते. उद्घोषणा यंत्रावरून त्याबाबत प्रवाशांना माहिती दिली गेली. त्या घटनेनंतर डोंबिवलीवरून धीम्या मार्गे जाणाऱ्या लोकलचा वेग मंदावला होता.