धक्कादायक! आठवीच्या मुलांना वाचताच येईना; ‘असर’च्या अहवालातील वास्तव; गणितही कच्चे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 11:39 IST2025-01-29T11:39:14+5:302025-01-29T11:39:43+5:30

जळगावच्या सहावी ते आठवीच्या ५५ टक्के मुलांना दुसरीचे पुस्तक वाचता येत नसल्याची बाब ‘असर’च्या अहवालातून समोर आली आहे.

8th graders cant even read The reality of Asars report | धक्कादायक! आठवीच्या मुलांना वाचताच येईना; ‘असर’च्या अहवालातील वास्तव; गणितही कच्चे

धक्कादायक! आठवीच्या मुलांना वाचताच येईना; ‘असर’च्या अहवालातील वास्तव; गणितही कच्चे

चंद्रकांत दडस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी शाळांतील इयत्ता सहावी ते आठवीच्या  केवळ ३५.४ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता येत असून, यातही धुळे जिल्ह्यातील केवळ १४.२ टक्के मुलांनाच भागाकार येत आहे. 
याशिवाय राज्यातील इयत्ता सहावी ते आठवीच्या ३० टक्के मुलांना अद्याप दुसरीचे पुस्तक वाचता येत नसून सर्वात कमी म्हणजे जळगावच्या सहावी ते आठवीच्या ५५ टक्के मुलांना दुसरीचे पुस्तक वाचता येत नसल्याची बाब ‘असर’च्या अहवालातून समोर आली आहे. देशभरात मात्र वाचनाचा आणि शिकण्याचा स्तर सुधारला असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

देशात महाराष्ट्र कुठे? 
महाराष्ट्रातील तिसरीच्या ३७% मुलांना दुसरीचे पुस्तक वाचता येते. २०२२ मध्ये हेच प्रमाण २६% होते. तर २०१८ मध्ये हे प्रमाण ४४.२% इतके होते. देशातील तिसरीच्या मुलांना दुसरीचे प्रमाण वाचता येण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

काय वाचता येईना?

एक होती आजी. एकदा तिला तिच्या बहिनीचे पत्र आले. आजीला तिने आपल्या घरी पूजेला बोलविले होते. आजीने निघताना घराला कुलूब लावले. ती प्रवासाला पायी निघाली.

किती मुलांना दुसरीचे पुस्तक वाचता येते? 

अमरावती     २३.३% 
नंदुरबार     २६.५%
जळगाव     २८.७%
नांदेड     ३३.४% 
अकोला     ३३.६% 
भंडारा     ३४.५%

किती मुलांना वजाबाकी करता येते? 

नंदुरबार     १६.७% 
धुळे     २३.७% 
यवतमाळ     ३१.७%
नाशिक     ३२.२% 
अमरावती     ३२.९% 
वाशिम     ३३.६% 

Web Title: 8th graders cant even read The reality of Asars report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.