डंपरखाली चिरडून ८ वर्षीय मुलाचा मालवणीत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 02:05 IST2021-01-19T02:04:46+5:302021-01-19T02:05:14+5:30

अजय हा मालवणीच्या अंबोजवाडी परिसरात राहात होता. साेमवारी दुपारी तो मालवणी परिसरात सायकलवरून फेऱ्या मारत होता. त्यावेळी डंपर रिव्हर्स घेत असताना चालकाचे मागे असलेल्या अजयकडे लक्ष गेले नाही व त्याची  धडक अजयच्या सायकलला बसली. 

8-year-old boy crushed by Dumper in Malvani | डंपरखाली चिरडून ८ वर्षीय मुलाचा मालवणीत मृत्यू

डंपरखाली चिरडून ८ वर्षीय मुलाचा मालवणीत मृत्यू

मुंबई : डंपरखाली चिरडून अजय बाबू पवार या आठ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. सोमवारी मालवणीमध्ये हा प्रकार घडला असून, याप्रकरणी मालवणी पोलिसांनी आदिल अन्सारी (४०) या चालकासह समीर बाबू अहमद शेख (१९) या क्लिनरला अटक केली. 

अजय हा मालवणीच्या अंबोजवाडी परिसरात राहात होता. साेमवारी दुपारी तो मालवणी परिसरात सायकलवरून फेऱ्या मारत होता. त्यावेळी डंपर रिव्हर्स घेत असताना चालकाचे मागे असलेल्या अजयकडे लक्ष गेले नाही व त्याची  धडक अजयच्या सायकलला बसली. 

यात तो खाली कोसळून डंपरच्या मागच्या चाकाखाली आला. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या अजयचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
याबाबत त्याच्या आई-वडिलांना समजताच त्यांनी नातेवाईकांसह पोलीस ठाण्याला घेराव घातला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढून जमावाला पांगवले. 

Web Title: 8-year-old boy crushed by Dumper in Malvani