दिल्लीत छापून मुंबईत आणल्या 7 कोटींच्या बनावट नोटा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 11:16 AM2022-01-28T11:16:32+5:302022-01-28T11:18:28+5:30

गुन्हे शाखेची दहिसर टोल नाक्यावर कारवाई, अभिनेत्यासह ७ अटकेत

7 crore counterfeit notes printed in Delhi and brought to Mumbai! | दिल्लीत छापून मुंबईत आणल्या 7 कोटींच्या बनावट नोटा!

दिल्लीत छापून मुंबईत आणल्या 7 कोटींच्या बनावट नोटा!

Next

मुंबई : मुंबईच्या दहिसर टोल नाक्यावर दिल्लीतून छपाई करून आणलेल्या ७ कोटींच्या बनावट नोटा गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एका अभिनेत्यासह ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तसेच छपाई करणाऱ्या आरोपीच्या शोधासाठी पथक दिल्लीला रवाना झाले आहे.
दहिसर टोल नाक्यावर चारजण बनावट नोटाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच, गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने सापळा रचला. बुधवारी एम. एच. ०२ एफ. जी. २९०७ या वाहनातून आलेल्या चौकडीला पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या गाडीतील बॅगेतून २ हजाराच्या अडीच हजार नोटा अशा एकूण ५ कोटींच्या बनावट नोटा मिळून आल्या. त्यानुसार, त्यांच्या विरोधात दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पथकाने अधिक तपास सुरू केला. गुन्हे

शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार, सहायक पोलीस आयुक्त काशीनाथ चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सचिन गवस, मानसिंग पाटील, भरत घोणे, विशाल पाटील, पुूनम यादव, अजित कानगुडे, सावंत यांनी ही कारवाई केली. ही चौकडी साथीदारांच्या मदतीने बनावट नोटा छापून त्या विविध ठिकाणी वितरित करत असल्याचे समोर आले. त्यांचे साथीदार अंधेरीतील हॉटेल अम्फामध्ये असल्याची माहिती मिळताच पथकाने तेथून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ कोटींच्या बनावट नोटा मिळून आल्या. दरम्यान, आरोपींना ३१ जानेवारीपर्यंत 
पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यापूर्वीही मुंबईत बनावट नोटांंचे वितरण...
दिल्लीतील आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे, तसेच अटक आरोपींनी यापूर्वी किती बनावट नोटा मुंबईत आणल्या याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले.अभिनेता, पेंटर, टेलर बनावट नोटाच्या टोळीत वसीम सलमानी (वय २९, उत्तर प्रदेश), मनोज शर्मा (३९, दिल्ली), सुमित ऊर्फ सॅम यशपाल शर्मा (३२, उत्तराखंड), विनोद विजयन (३९,केरळ), प्रदीप चौधरी (२८,उत्तर प्रदेश), आफाक अहमद अन्सार अहमद अन्सारी (३३, उत्तर प्रदेश), इसरार अहमद अब्दुल सलाम कुरेशी (४२, उत्तर प्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यामध्ये सुमित हा अभिनेता म्हणून काम करतो, तर अन्य आरोपी सलून, टेलर, पेंटिंग, इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये काम करतात.

दुकाने, सुपर मार्केटमध्ये मिळणार वाइन!
एक हजार चौरस फुटांपेक्षा मोठी असलेली किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेतला. फलोत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी 
हा निर्णय घेत असल्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.   

‘महाराजा’ला टाटांचे पंख
जगभरातील हवाई वाहतूक सेवा क्षेत्राचे ज्याकडे लक्ष लागले होते, त्या एअर इंडियाच्या केंद्राकडून टाटा सन्सकडे होणाऱ्या मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया अखेर गुरुवारी पूर्ण झाली. तब्बल ६९ वर्षांनंतर एअर इंडियावर टाटा उद्योग समूहाचा संपूर्ण हक्क प्रस्थापित झाला आहे.   

Web Title: 7 crore counterfeit notes printed in Delhi and brought to Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.