मलेरियाचे ६६६ रुग्ण, तर लेप्टोचे दोन बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 03:15 AM2019-10-01T03:15:17+5:302019-10-01T03:15:37+5:30

सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात साथीच्या आजारांचे दोन बळी गेले आहेत.

666 malaria patients found in Mumbai, two lepto patient death | मलेरियाचे ६६६ रुग्ण, तर लेप्टोचे दोन बळी

मलेरियाचे ६६६ रुग्ण, तर लेप्टोचे दोन बळी

Next

मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात साथीच्या आजारांचे दोन बळी गेले आहेत. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, मुंबईत दोघांचा लेप्टोने मृत्यू झाला आहे. तर डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे, या तापाचे ३ हजार ५२७ रुग्ण पालिकेच्या विविध रुग्णालयांत दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे, या महिन्यात मलेरियाच्या रुग्णांनीही ६६६ चा टप्पा गाठला आहे. शहर उपनगरात पाऊस ओसरला असला तरीही आजारांची पकड कायम आहे.

अंधेरी येथे दोंघांचा लेप्टोने मृत्यू झाल्याची नोंद आहे. के/पश्चिम प्रभागात ६१ वर्षाच्या व्यक्तीचे लेप्टोने मृत्यू झाला ही व्यक्ती टॅक्सी चालक होती. तर के/पूर्वेकडील ४३ वर्षीय पुरुषाचाही लेप्टोने मृत्यू झाला.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने ठाण मांडले होते. यात पूरग्रस्त स्थिती मुुंबईत निर्माण झाली होती. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याच्या तक्रारी होत्या, अशी स्थिती असताना साथीच्या आजारांचा जोर
वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

सप्टेंबर महिन्यात मुंबईत तापाचे तीन हजार ५२७ रुग्ण आढळले आहेत.

Web Title: 666 malaria patients found in Mumbai, two lepto patient death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.