५० किलो मिठापासून साकारली रांगोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 04:09 AM2018-11-08T04:09:50+5:302018-11-08T04:10:21+5:30

सार्वजनिक आरोग्य सेवा संचालनालय येथे दीपावलीच्या मुहूर्तावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा लोगो वापरून आरोग्याचा संदेश देणारी ५० किलोचे जाड मीठ व ५ किलोचे रंग वापरून रांगोळी साकारण्यात आली आहे.

50 kg of sweet potato rangoli | ५० किलो मिठापासून साकारली रांगोळी

५० किलो मिठापासून साकारली रांगोळी

googlenewsNext

मुंबई  - सार्वजनिक आरोग्य सेवा संचालनालय येथे दीपावलीच्या मुहूर्तावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा लोगो वापरून आरोग्याचा संदेश देणारी ५० किलोचे जाड मीठ व ५ किलोचे रंग वापरून रांगोळी साकारण्यात आली आहे. आरोग्य विभागातील संचालक कक्षात कार्यरत असलेले शिपाई पदावर काम करणारे शिवाजी चौगुले यांच्या हस्ते रांगोळी रेखाटण्यात आली. त्यांना रांगोळी साकारण्यासाठी तब्बल ६ तासांचा अवधी लागला. याप्रसंगी आरोग्य सेवेचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी शिवाजीचे कौतुक केले. मिठापासून बनविलेल्या निवडक रांगोळीसाठी शिवाजी लिम्का बुकसाठी प्रयत्नशील आहेत.
शिवाजी चौगुले यांनी सांगितले की, लहानपणापासून चित्र काढण्याची आवड होती. मात्र, कुठेही चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले नाही. प्रत्येक कलाकार आपली वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेत आपल्या कल्पनेतून कला सादर करतो. त्याचप्रमाणे, मिठाचा वापर करून रांगोळी काढण्याची कल्पना सुचली. माझ्या कलेचा प्रसार करण्यासाठी मोफत कार्यशाळा घेणार आहे. माझ्यासारखे गरजू कलाकारांना सोबत घेऊन काम करायचे आहे. माझ्या कलेला वरिष्ठांचा आणि सहकार्याचा कायम पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 50 kg of sweet potato rangoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.