हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी पालिकेच्या ताफ्यात ५ नवी केंद्र, कोणत्या भागात असणार केंद्र?
By सीमा महांगडे | Updated: December 5, 2025 12:15 IST2025-12-05T12:13:36+5:302025-12-05T12:15:00+5:30
Mumbai Air Pollution: मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वायू वैविध्य सर्वेक्षण आणि संशोधन प्रयोगशाळेमार्फत विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी सर्वेक्षण केले जाते.

हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी पालिकेच्या ताफ्यात ५ नवी केंद्र, कोणत्या भागात असणार केंद्र?
- सीमा महांगडे, मुंबई
मुंबईतीलप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना महापालिकाही उपाययोजनांमध्ये वाढ करीत आहे. पालिकेची पाच स्वयंचलित हवा गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे आहेत. त्यांत आता आणखी ५ केंद्रांची भर पडणार आहे. ही केंद्रे दादर, खार, गोरेगाव, दहिसर आणि मुलुंडमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त भागांतील हवा गुणवत्तेची नोंद करण्यात येऊन वायू प्रदूषणावर उपाययोजना करणे शक्य होईल, असे एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वायू वैविध्य सर्वेक्षण आणि संशोधन प्रयोगशाळेमार्फत विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. कचराभूमी आणि सर्वांत वर्दळीच्या वाहतूक नाक्यांवरील हवेची गुणवत्ता स्वयंचलित वाहनांमार्फत तपासली जाते.
नवी केंद्रे नेमकी कुठे?
गोरेगाव (पूर्व) आरे गार्डन, छोटा काश्मीर
मुलुंड (पूर्व) सी.डी. देशमुख उद्यान
दहिसर (पूर्व) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान
दादर (प.) प्रमोद महाजन पार्क
खार (प.) सहायक आयुक्त कार्यालय
प्रदूषणाची रिअल टाइम
सर्व केंद्रे सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्डाशी जोडल्यामुळे प्रदूषणाचा रिअल टाइम लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. प्रदूषणाचा स्तर किती आहे, हे कळल्यावर पालिकेलाही उपाययोजना करण्यास मदत होते.