Video - नायर रुग्णालयातून चोरीला गेलेलं पाच दिवसांचं बाळ सापडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 11:29 IST2019-06-14T09:47:32+5:302019-06-14T11:29:40+5:30

नायर रुग्णालयातून पाच दिवसांचं बाळ चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला होता. गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास चोरीला गेलेले बाळ शोधून काढण्यात आग्रीपाडा पोलिसांना यश आलं आहे.

5-day-old baby boy stolen from Mumbai civic hospital, woman booked | Video - नायर रुग्णालयातून चोरीला गेलेलं पाच दिवसांचं बाळ सापडलं

Video - नायर रुग्णालयातून चोरीला गेलेलं पाच दिवसांचं बाळ सापडलं

ठळक मुद्दे नायर रुग्णालयातून पाच दिवसांचं बाळ चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला होता. गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास चोरीला गेलेले बाळ शोधून काढण्यात आग्रीपाडा पोलिसांना यश आलं आहे. नायर रुग्णालयातून बाळ चोरणाऱ्या महिलेला अखेर अटक करण्यात आली आहे. 

मुंबई - नायर रुग्णालयातून पाच दिवसांचं बाळ चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (13 जून) समोर आला होता. गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास चोरीला गेलेले बाळ शोधून काढण्यात आग्रीपाडा पोलिसांना यश आलं आहे. रुग्णालयातून बाळ चोरणाऱ्या महिलेला अखेर अटक करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, महिला गुरुवारी संध्याकाळी बाळाला घेऊन सांताक्रूझमधील व्ही.एन.देसाई या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. वाकोला परिसरातून पोलिसांनी बाळ आणि महिलेला ताब्यात घेतले. हझेल डोनाल्ड (37) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी महिला मूळची कोरियाची असून नालासोपारा परिसरात राहत असल्याचे समोर आले आहे. 

महिलेने नायर रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक सातमधून बाळ चोरलं होतं. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या प्रकरणी बाळाची आई शीतल साळवी यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. त्यानंतर आता महिलेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

 

Web Title: 5-day-old baby boy stolen from Mumbai civic hospital, woman booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.