महाराष्ट्रात दररोज ४२ अपघाती मृत्यू; मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील अपघात किती टक्क्यांनी वाढले? आकडेवारी समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 06:13 IST2025-01-31T06:12:56+5:302025-01-31T06:13:08+5:30
समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या ४ टक्क्यांनी घटली आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

महाराष्ट्रात दररोज ४२ अपघाती मृत्यू; मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील अपघात किती टक्क्यांनी वाढले? आकडेवारी समोर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्रात रस्ते अपघातांची संख्या २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये वाढली असून, एकाच वर्षात अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या १५ हजारांहून अधिक आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात रोज ४२ अपघाती मृत्यू होत आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील अपघात १९% वाढले, तर समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या ४ टक्क्यांनी घटली आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
नऊ जिल्हे आणि शहरांमध्ये मृत्यूंमध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात अपघाती मृत्यूंमध्ये सर्वाधिक २५ टक्के वाढ झाली आहे.
२६% वाढली मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील अपघाती मृतांची संख्या
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे
वर्ष अपघात मृत्यू
२०२३ १५४ ६५
२०२४ १८४ ८२