चुकीच्या र्पाकिंगमुळे ६० टक्के मृत्यू; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन वर्षांत १०६ जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 12:53 AM2019-10-27T00:53:42+5:302019-10-27T06:36:27+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नुकताच र्पाकिंग केलेला ट्रक आणि पाठीमागून आलेल्या बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता.

4 percent death due to erroneous rape; Mumbai-Pune Expressway lost two lives in two years | चुकीच्या र्पाकिंगमुळे ६० टक्के मृत्यू; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन वर्षांत १०६ जणांनी गमावला जीव

चुकीच्या र्पाकिंगमुळे ६० टक्के मृत्यू; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन वर्षांत १०६ जणांनी गमावला जीव

googlenewsNext

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची र्पाकिंग केली जाते. त्या वाहनाला पाठीमागून येणाºयो वाहनाची धडक होते. गेल्या दोन वर्षांत अशा अपघातांमध्ये १०६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सेव्ह लाईफ फाऊंडेशनने केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नुकताच र्पाकिंग केलेला ट्रक आणि पाठीमागून आलेल्या बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर सेव्ह लाईफ फाऊंडेशनने अभ्यास केला असता २०१८ आणि २०१९ या वर्षात (२२ महिन्यांमध्ये) आतापर्यंत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहने पार्क केल्यामुळे झालेल्या अपघातात १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांमागील महत्त्वाचे कारणे म्हणजे, चुकीची उभी असलेली वाहने, ओव्हरटेक करण्यासाठी अत्यावश्यक लेनचा वापर, वाहनांचा वेग, चालकाच्या चुका याही आहेत.

सेव्ह लाईफ फाऊंडेशचे संस्थापक पियुष तिवारी म्हणाले की, महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांना आणि धिम्यागतीने जाणाऱ्या वाहनाला इतर वाहनाने धडक देणे हे रस्ते सुरक्षा मोहिमेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. महामार्गावर अवजड वाहने थांबविणे, वाहनचालकांचा थकवा याबाबत सध्या काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच ३००० अवजड वाहन चालकांना सुरक्षित वाहने चालविण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

प्रवाशांनी सहकार्य करणे गरजेचे
एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष राधेशाम मोपलवार म्हणाले की, विविध उपक्रम राबवून रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रस्त्यात वाहने उभी केल्याने जे अपघात होतात ते कमी करण्यासाठी प्रवाशांनी सहकार्य केले पाहिजे. नागरिकांनी वेगात वाहने चालवू नये तसेच वाहन चालविण्यापूर्वी पुरेशी विश्रांती घ्यायला हवी. अचानक लेन बदलणे आणि थकवा येणे ही अपघात होण्याची महत्त्वाची कारणे आहेत असेही त्यांनी सांगितले.

 

Web Title: 4 percent death due to erroneous rape; Mumbai-Pune Expressway lost two lives in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.