35 thousand for a pipe of 500 rupees; Mumbaikars' mouths watered | ५०० रुपयांच्या नळाला ३५ हजार; मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले

५०० रुपयांच्या नळाला ३५ हजार; मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले

मुंबई : मालाड, मालवणी, चेंबूर, गोवंडीसह मुंबईतल्या कोणत्याही भागात नळ घ्यायचा असेल तर आजही नागरिकांना मुंबई महापालिकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. दूर्देव म्हणजे पाच घरांच्या नळ जोडणीसाठी महापालिकेला अदा करावे लागणा-या ५०० रुपयासोबत पाईप आणि इतर खर्च पकडून १० हजार रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. मात्र सुरु असलेल्या गैरप्रकारांमुळे पाच घरांच्यासाठीच्या एका नळजोडणीला नागरिकांना तब्बल ३५ हजार रुपये द्यावे लागत आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेने याकामी सरकारी प्लंबर नेमला आणि त्याने नळ जोडणीच्या ठिकाणाचा सर्व्हे करत जोडणी दिली तर साहजिकच हा खर्च ३५ हजारांहून १० हजार रुपयांवर येऊन ठेपले, अशी माहिती सुत्रांनी दिली.

मुंबईतल्या वस्तीमध्ये कंत्राटदार जातात. नळ जोडणी हवी असेल तर कंत्राटदाराकडून पैसे आकारले जातात. पाच घरांसाठी नळ जोडणी घेतली तर परवानाधारक कंत्राटदाराला ३५ हजार रुपये द्यावे लागतात. यातच महापालिका आणि परवानाधारक कंत्राटदाराच्या रक्कमेचा समावेश असतो. यातील १० हजार रुपये ही रक्कम सरकारी खर्च म्हणून पकडली तर यात अंदाजे ५०० रुपये हे चलान असते. उर्वरित खर्च पाईप लाईनचा असतो. हा सगळा खर्च १० हजारांच्या आसपास असतो. यातच मीटरचा खर्च असतो. हा खर्च पाच घरे वाटून घेतात. आता ३५ हजारांतले उरले २५ हजार रुपये; हे पैसे कुठे जातात? याचे उत्तर कोणीच देत नाही. नळ जोडणीसाठी अत्यंत कमी खर्च असताना ३५ हजार का आकारले जातात. गरिबांकडून एवढे का आकारले जातात. गरिबांना पाणी द्यायचे केवळ गरिब नाही तर प्रत्येकाला पाणी देण्यासाठी सरकारी प्लंबर का नाही. सरकारी प्लंबर असेल तर जेथे नळ जोडणी आवश्यक आहे; तेथे तो दाखल होईल. सर्व्हे करेल. आणि याद्वारे १० हजारांत काम होईल. म्हणजे १० हजारांत नळ जोडणी होईल. दरम्यान, याबाबत परवानाधारक प्लंबर सरकारी असावा तो खासगी का आहे? याची उत्तरे महापालिका देत नाही, असे घर बचाओ घर बनाओ आंदोलनाचे बिलाल खान यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 35 thousand for a pipe of 500 rupees; Mumbaikars' mouths watered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.