Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लालबागचा राजा' आरोग्योत्सवात २४६ जणांचे प्लाझ्मादान; १० हजारहून अधिक रक्तदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 20:20 IST

गलवान खोऱ्यात देशासाठी शहीद झालेल्या २२ जवानांच्या कुटुंबीयांना मंडळातर्फे १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकी २ लाख रूपये देण्यात आले.

ठळक मुद्देमुंबई व राज्यातील शहीद झालेल्या ९१ पोलिस कर्मचारी बांधवांच्या कुटुंबीयांना शौर्यचिन्ह आणि प्रत्येकी एक लाख रूपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा आयोजित केलेल्या आरोग्योत्सवात आत्तापर्यंत २४६ जणांनी प्लाझ्मादान केले आहे. तर १० हजारांहून अधिक जणांनी रक्तदान केले आहे.

याचबरोबर, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून कोरोना संकट काळात सेवा बजावताना मुंबई व राज्यातील शहीद झालेल्या ९१ पोलिस कर्मचारी बांधवांच्या कुटुंबीयांना शौर्यचिन्ह आणि प्रत्येकी एक लाख रूपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. तर गलवान खोऱ्यात देशासाठी शहीद झालेल्या २२ जवानांच्या कुटुंबीयांना मंडळातर्फे १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकी २ लाख रूपये देण्यात आले. 

याशिवाय, ४ मे ते ४ जून या कालावधीत जनता क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे आयोजित करून जवळपास २९ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधांचे वाटप केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.

दरम्यान, यंदा गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षाकारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्त आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून घेण्यात आला होता. 

आणखी बातम्या...

- Gold-Silver Price : सोने पुन्हा महागले; चांदीच्या किंमतीत 2000 रुपयांपेक्षा जास्त वाढ, पाहा आजचे दर

- भाजपात प्रवेश करणार होता हिस्ट्रीशीटर, पोलिसांना पाहताच ठोकली धूम

- चारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती    

- 'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम

- "राहुल गांधींनी 6 महिन्यांपूर्वी दिला होता इशारा", जीडीपीवरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा    

- 'लाल डोळे कधी दिसणार?', चिनी सैनिकांच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर निशाणा     

- 'पिया तू अब तो आजा...' या गाण्यावर वृद्ध महिलांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल   

टॅग्स :लालबागचा राजागणेशोत्सव