नेचर क्विझमध्ये २० हजार जणांनी सहभाग नोंदविला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 03:35 PM2020-12-09T15:35:58+5:302020-12-09T15:36:18+5:30

Nature Quiz : वनस्पती आणि जीवजंतूंशी निगडित प्रश्न

20,000 people participated in the Nature Quiz | नेचर क्विझमध्ये २० हजार जणांनी सहभाग नोंदविला

नेचर क्विझमध्ये २० हजार जणांनी सहभाग नोंदविला

Next

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी

मुंबई : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने नुकतेच सलीम अली नेचर क्विझचे ऑनलाईन आयोजन केले होते. पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या सन्मानार्थ आयोजित या कार्यक्रमात भारत आणि जगातील सुमारे २० हजार नागरिक सहभागी झाले होते. वनस्पती आणि जीवजंतूंशी निगडित प्रश्न यात होते.

निसर्ग प्रेमींना त्यांच्या आजूबाजूच्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल त्यांचे ज्ञान पुनरुज्जीवित आणि सुधारित करण्याकरिता याची मदत झाली. बीएनएचएस निसर्गप्रेमींची फौज तयार करण्यास, निसर्ग संवर्धनासाठी इच्छुक असलेल्या अधिक लोकांना जोडण्यास उत्सुक आहे. संवर्धन आणि हवामान चळवळीचा हा एक भाग आहे, असे बीएनएचएसचे अध्यक्ष बिट्टू सहगल यांनी सांगितले. दरम्यान, निसर्ग आणि पक्षी संवर्धन करण्याकरिता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी कायम काम करत असून, सोसायटीने कोस्टल अँड मरीन बायोडायव्हर्सिटी असिसमेंट टूलची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळामध्ये सागरी जीवांची आणि अधिवासांची नोंद आहे. नागरिक, विद्यार्थी संस्थांना याचा उपयोग होईल.
 

Web Title: 20,000 people participated in the Nature Quiz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.