162 special trains to run for Ganeshotsav on Konkan Railway route; Servants will get relief | कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी धावणार 162 स्पेशल गाड्या; चाकरमान्यांना मिळणार दिलासा

कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी धावणार 162 स्पेशल गाड्या; चाकरमान्यांना मिळणार दिलासा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची अधिकृत घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रक 15 ते 5 सप्टेंबर दरम्यानस 162 गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी माहिती दिली आहे.

14 ऑगस्टला सुटणार पहिली गाडी आहे. 14 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत सुटणाऱ्या 162 गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. 81 अप तर 81 डाऊन अशा रेल्वेच्या फेऱ्या असणार आहे. याबाबत लवकरच अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात येईल अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 162 special trains to run for Ganeshotsav on Konkan Railway route; Servants will get relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.