Join us

वन शहीद स्वाती यांच्या कुटुंबीयांना १५ लाख, मुख्यमंत्र्यांचा निर्णय; पतीला वनसेवेत घेणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 06:18 IST

वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामावून घेण्याचेही निर्देशित करण्यात आले आहे

मुंबई : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबीयांचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांत्वन केले. त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत देण्यासह त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ढुमणे यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामावून घेण्याचेही निर्देशित करण्यात आले आहे 

टॅग्स :जंगलताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पवाघउद्धव ठाकरे