वरळीला जाणाऱ्या बेस्टच्या वातानुकूलित बसला अपघात, 15 प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 13:12 IST2020-10-17T12:54:48+5:302020-10-17T13:12:07+5:30
भांडुप डेपो येथून बस क्रमांक 27 ही बस 20 ते 25 प्रवाशांना घेऊन वरळीला जात होती. याच दरम्यान विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावरील विक्रोळी उड्डाणपूल जवळील घटकोपरच्या दिशेने जाताना बसच्या समोर अचानकपणे मोटरसायकल आली

वरळीला जाणाऱ्या बेस्टच्या वातानुकूलित बसला अपघात, 15 प्रवासी जखमी
मुंबई - शहरातील विक्रोळी येथे बेस्टच्या वातानुकूलित बसला अपघात झाला असून त्यामध्ये 12 ते 15 प्रवासी जखमी झाले आहेत. अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याचा प्रयत्न करताना, बसचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील प्रवाशांना धीर दिला. मात्र, अचानक बस पलटी झाल्याने प्रवाशांमध्ये भिती निर्माण झाली होती.
भांडुप डेपो येथून बस क्रमांक 27 ही बस 20 ते 25 प्रवाशांना घेऊन वरळीला जात होती. याच दरम्यान विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावरील विक्रोळी उड्डाणपूल जवळील घटकोपरच्या दिशेने जाताना बसच्या समोर अचानकपणे मोटरसायकल आली. त्या मोटरसायकल चालकास वाचविण्यासाठी गेले असता बस चालकाचे स्टेरींगवरून नियंत्रण सुटले. त्यामुळे, विक्रोळी येथील उड्डाणपूललगतच्या फुटपाथवर बसने धडक दिल्याने यात असलेले 13 ते 15 प्रवासी जखमी झाले आहेत. बसचालक सिराज पाटण यांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांना जवळील राजावाडी व विक्रोळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळतचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सदर घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.