26/11 Terror Attack : कसाबला जिवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळेंसह १४ पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 14:59 IST2020-03-04T14:54:53+5:302020-03-04T14:59:00+5:30
26/11 Terror Attack : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.

26/11 Terror Attack : कसाबला जिवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळेंसह १४ पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती
ठळक मुद्देअजमल कसाब याला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना एक टप्पा पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे.या सर्व १४ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना आता एक टप्पा पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
मुंबई - २६/११ च्या मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना एक टप्पा पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.
अजमल कसाब याला जिवंत पकडताना तुकाराम ओंबळे यांना वीरमरण आलं होतं. शहीद तुकाराम ओंबळे यांच्यासह १४ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडले होते. त्यांना शौर्यपदकाने गौरवविण्यात आले होते. या सर्व १४ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना आता एक टप्पा पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.