खेळताना गळफास लागून 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 23:00 IST2020-07-17T22:59:29+5:302020-07-17T23:00:06+5:30
येथील इमारतीत सुरक्षा रक्षक हा पत्नी आणि तीन मुलांसह राहात होता. शुक्रवारी तो कामानिमित्त बाहेर गेला होता

खेळताना गळफास लागून 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
मीरारोड - मुंबईच्या मीरा रोडच्या सृष्टी परीसरात एका बारा वर्षीय मुलीचा खेळताना गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. सृष्टी परिसरातील एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या मुलीबाबत ही दुर्घटना घडली आहे.
येथील इमारतीत सुरक्षा रक्षक हा पत्नी आणि तीन मुलांसह राहात होता. शुक्रवारी तो कामानिमित्त बाहेर गेला होता व त्याची पत्नी जेवण बनवत होती. त्यावेळी त्यांची 12 वर्षांची मुलगी गळ्यात ओढणी घालून गॅस सिलेंडरवर उभी राहून खेळत होती. खेळताना तिची ओढणी खांबाला अडकली आणि तिला ओढणीचा फास लागला. ती बेशुद्ध होऊन खाली पडली असता तिला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. काशिमीरा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.