Join us
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: राज्यात दहावीच्या परीक्षा १५ मार्चपासून; बारावीच्या परीक्षेची तारीखही जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 18:53 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन या परीक्षा नियमित पद्धतीने होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

मुंबई- दहावी आणि बारावीच्या परीक्षाबाबतीतील संभ्रम दूर झाला असून त्या नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. 

दहावीच्या परीक्षा या १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडणार आहेत. त्याचसोबत बारावीच्या लेखी परीक्षा या ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन या परीक्षा नियमित पद्धतीने होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

इयत्ता १२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इ. १०वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य,सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक,पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

टॅग्स :दहावी12वी परीक्षावर्षा गायकवाडमहाराष्ट्र