हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि कॅटरिना कैफ यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाला एक आगळावेगळा बहुमान मिळाला आहे. स्पेनमधील मार्केटिंग मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात केस स्टडी म्हणून या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. निर्देशक जोया अख्तरने या चित्रपटाची बरीचशी शूटिंग स्पेनमध्येच केली होती, हे विशेष. स्पेनमधील पर्यटनाला ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटामुळे कशी चालना मिळाली, हे या अभ्यासक्रमात सांगण्यात आले आहे. या चित्रपटात स्पेनमधील अनेक पर्यटन स्थळे दाखविण्यात आलेली आहेत. शिवाय तेथील प्रसिद्ध टोमाटिना फेस्टिव्हलमध्येही या चित्रपटाची शूटिंग करण्यात आलेली होती.
स्पेनच्या अभ्यासक्रमात ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’
By admin | Updated: June 9, 2014 14:53 IST