Join us  

'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 5:29 PM

कपिल शर्माची सर्वच आठवण काढत आहेत. दरम्यान त्याची जागा भरुन काढण्यासाठी झाकीर खान येत आहे.

कॉमेडीच्या जगात कपिल शर्मा (Kapil Sharma) सध्या अग्रेसर आहे. 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा'मधून त्याने अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यानंतर आता तो नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' घेऊन आला. नेटफ्लिक्समुळे आता तो जगभरात पोहोचला आहे. दरम्यान आता टीव्हीवर कपिलची जागा भरुन काढण्यासाठी झाकीर खान तयार आहे. चॅनलची झाकीरसोबत चर्चा सुरु आहे. टीव्हीवर येणारा झाकीर खान (Zakir Khan) शो हा कॉमेडी आणि शायरीवर आधारित असणार आहे.

एकीकडे कपिल शर्मा नेटफ्लिक्सवरुन चाहत्यांना दर शनिवार भेटत आहे. त्यामुळे टीव्हीवर कपिल शर्माची सर्वच आठवण काढत आहेत. दरम्यान त्याची जागा भरुन काढण्यासाठी झाकीर खान येत आहे. झाकीरने याआधी रिएलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे. पण आता पहिल्यांदाच तो स्वतंत्र शो घेऊन टीव्हीवर येणार आहे. झाकीरचे लाखो चाहते आहेत. त्याचे स्टँडअप शो जगभरात गाजतात. आता त्याला टीव्हीवर कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्वाचं आहे.

कपिलला टक्कर देण्यासाठी अनेक चॅनल्सने कॉमेडी शोज सुरु केले होते. कृष्णा अभिषेकनेही भारतीसोबत शो आणला होता. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी तेही कपिलसोबतच आले. आता झाकीर खानच्या नव्या शोची चाहते वाट पाहत आहेत. 

टॅग्स :कपिल शर्मा टेलिव्हिजनसेलिब्रिटी