Join us

झहीर-सागरिकाच्या साखरपुड्यात विराट-अनुष्काचा जलवा

By admin | Updated: May 24, 2017 13:31 IST

भारतीय संघातील माजी गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांचा मंगळवारी साखरपुडा झाला.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24-  भारतीय संघातील माजी गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांचा मंगळवारी  साखरपुडा झाला. मुंबईमध्ये शानदार पार्टीचं आयोजन करून साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. खरंतर एक महिन्याआधी झहीरने साखरपुड्याची घोषणा केली होती.  आता लवकरच या दोघांच्या लग्नाची तारीख जाहीर केली जाणार आहे.
पण साखरपुड्याच्या या कार्यक्रमात एका वेगळ्या जोडीने सगळ्यांचं लक्ष वेधलं. झहीर आणि सागरिकाच्या साखरपुड्याला विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा एकत्र दिसले. कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील नात्याबाबतही मागील काही दिवसांपासून चर्चा चालू आहे. पण नेहमी सगळ्यांपासून आपलं नातं लपवणारे विराट-अनुष्का एकत्र कार्यक्रमाला आल्याने दोघांबद्दलची चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. येत्या डिसेंबरदरम्यान विराट आणि अनुष्काही साखरपुडा करतील असं बोलंल जात होतं. विराट आणि अनुष्का काळ्या-पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून तसंच एकमेकांचा हात पकडून कार्यक्रमात हजर झाले. त्यामुळे अगदी सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर खिळल्या होत्या. कार्यक्रमातील दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 
सिनेसृष्टीतील अनेक कलाकार या कार्यक्रमाला हजर होते. यामध्ये रवीना टंडन व तिचा पती अनिल थडानी, मंदिरा बेदी, बॉबी देओल, अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारीया गोरेट्टी उपस्थित होते. याशिवाय रोहित शर्मा, युवराज सिंग, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली, गौरव कपूर उपस्थित होते