‘बॉडीगार्ड’ या सिनेमामुळे चर्चेत आलेली मॉडेल आणि भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याची पत्नी हेजल किच दीर्घकाळापासून चित्रपटांपासून दूर आहे. चांगल्या ऑफर मिळत नसल्याने मी अभिनयापासून लांब असल्याचे हेजलने अलीकडे सांगितले होते. पण कदाचित आता तिला मनासारखी ऑफर मिळाली आहे. होय, आमिर खानची मुलगी इरा खान दिग्दर्शित एका नाटकामधून हेजल अॅक्टिंगच्या दुनियेत कमबॅक करणार आहे. इरा या नाटकाद्वारे दिग्दर्शनक्षेत्रात पाऊल ठेवतेय. ‘युरीपायडस मेडिया’ असे या नाटकाचे नाव आहे.
युवीची पत्नी बनणार आमिर खानच्या लेकीच्या नाटकाची ‘हिरोईन’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 13:43 IST
‘बॉडीगार्ड’ या सिनेमामुळे चर्चेत आलेली मॉडेल आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याची पत्नी हेजल किच दीर्घकाळापासून चित्रपटांपासून दूर आहे.
युवीची पत्नी बनणार आमिर खानच्या लेकीच्या नाटकाची ‘हिरोईन’ !
ठळक मुद्दे हेजल किच हिने सलमान खानच्या गाजलेल्या ‘बॉडीगार्ड’ या भूमिका साकारली होती.