विराट कोहली आणि अनुष्काचे प्रेम कोणापासूनही लपून राहिलेले नाही. प्रसिद्धीमाध्यमांसमोर वा कुठेही उघडपणे त्यांनी प्रेमाची कबुली दिली नव्हती. मात्र विराट शेवटी अनुष्का आपली प्रेयसी असल्याचे कबूल केलेच. विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीपासून खेळाडूंना त्यांच्या पत्नी व प्रेयसीबरोबर राहण्याची परवानगी बीसीसीआयने दिली. ती संधी न दवडता लगेचच विराटने अनुष्काची निर्मिती असलेला 'एनएच१०’ चित्रपट पाहिला. त्यानंतर टिष्ट्वटरवरून मी नुकताच अनुष्काचा चित्रपट पाहिला असून, माझी प्रेयसी अनुष्काने सुंदर अभिनय केला आहे, असे टिष्ट्वट केले. त्यामुळे आता अनुष्का विराटची प्रेयसी असल्याचे साहजिकच जगजाहीर झाले आहे.
यू आर माय लव्ह
By admin | Updated: March 18, 2015 23:05 IST