Join us  

'बच्चू आहेस तू'; सई ताम्हणकरने कॅमेरासमोर उडवली संजय जाधवची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 4:15 PM

Sai Tamhankar: मोठेपणा करणं संजय जाधवला पडलं महागात; सईने केला पाणउतारा

मराठीतील दोन दमदार व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav).  आजवर सईने संजय जाधव यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे या दोघांमधील मैत्री साऱ्यांनाच ठावूक आहे. बऱ्याचदा कलाविश्वात त्यांच्या मैत्रीची चर्चा होते.कायम एकमेकांची साथ देणाऱ्या या जोडीत सध्या धुसफूस सुरु आहे. सईने एका व्हिडीओमध्ये चक्क संजय जाधवचा पाणउतारा केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सईचा दांडगा वावर असल्याचं साऱ्यांनीच पाहिलं आहे. मात्र, आता संजय जाधवदेखील सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. इतकंच नाही तर ते सातत्याने त्यांचे भन्नाट रिल्स शेअर करत आहेत. यामध्येच त्यांनी सई ताम्हणकरसोबत एक रिल केलं. मात्र, हे रिल त्यांना महागात पडलं.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सई तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसली होती. तितक्यात संजय जाधव तिथे आले आणि त्यांच्या रिल्सचं कौतुक करु लागले. इतकंच नाही तर फॉलोअर्स वाढवण्यासाठी तू सुद्धा रिल्स कर असा सल्ला ते सईला देतात.

"अरे दादा तू रिल्स करायला लागला आहेस. कसले भारी रिल्स असतात तुझे", असं सई म्हणते. त्यावर,  सई तू सुद्धा रिल्स करायला पाहिजे. या रिल्सचा कसला भारी परिणाम होतो करिअरमध्ये. त्यामुळे काय होतं सोशल मीडियावर आपला वावर वाढतो ना. लोकप्रियता वाढते त्यामुळे. तू करायला पाहिजे. तू पण लोकप्रिय होशील. आता मी बघ ना राय 68 k फॉलोअर्स आहेत माझे. तू करायला पाहिजे. तुझे फॉलोअर्स वाढणार", असं संजय जाधव म्हणतात. त्यांचं हे बोलणं ऐकल्यावर सई तिचा मोबाईल काढते आणि, "3.4 M असं तिचे फॉलोअर्स दाखवते. इतकंच नाही तर बच्चूच आहेस तू ",असं म्हणू त्यांची खिल्ली उडवते.

दरम्यान, या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. आतापर्यंत अनेकांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

टॅग्स :सई ताम्हणकरसेलिब्रिटीसंजय जाधवसिनेमा