Join us

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील यश-समीर आले एकत्र, मालिकेच्या सीक्वलच्या चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 13:45 IST

यश आणि समीर म्हणजेय अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) एकत्र आले होते. या भेटीचा फोटो संकर्षणने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath). या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेतील नेहा, परी, यश आणि समीर या पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले होते. या मालिकेनं निरोप घेतला असला तरी आजही या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. या मालिकेचा सीक्वल कधी येणार, याची वाट प्रेक्षक पाहत आहेत. दरम्यान आता यश आणि समीर म्हणजेय अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) एकत्र आले होते. या भेटीचा फोटो संकर्षणने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संकर्षण कऱ्हाडेने श्रेयस तळपदेसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की,  श्रेयस संकर्षण = यश समीर ❤️ काल खूप दिवसांनी भेटलो.. खूप गप्पा मारल्या .. खूप हसलो …. फार फार मज्जा आली … ह्या गप्पा तुम्हालाही पहायला ऐकायला आवडतील का ..? कुठे कसं ते श्रेयस तळपदे सांगतील …. 

संकर्षणची ही पोस्ट पाहून चाहते खूश झाले आहेत. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा सीक्वल येणार आहे, असे वाटत आहे. या मालिकेतील अभिनेत्री शीतल क्षिरसागरने लिहिले की, तुम्हा दोघांना एकत्र पाहून खूप आनंद झाला....माझे प्रिय यश आणि समीर. एका युजरने म्हटले की, मराठीतील श्रेष्ठ जोडी. दुसऱ्या युजरने म्हटले की, तुमच्या दोघांची जोडी अप्रतिम आहे...खरंच. आणखी एकाने लिहिले की, छान जोडी, छान केमिस्ट्री. 

वर्कफ्रंटसंकर्षण कऱ्हाडे आणि श्रेय तळपदेच्या भेटीच्या पोस्टनंतर आता ते दोघे काय नवीन घेऊन येणार आहेत, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर श्रेयसचा नुकताच कर्तम भुगतम हा चित्रपट भेटीला आला. तर संकर्षण नियम व अटी लागू या नाटकात काम करताना दिसतो आहे.   

टॅग्स :श्रेयस तळपदे