Join us

सलमान म्हणून पुनर्जन्म घ्यायला आवडेल - सनी लिऑन

By admin | Updated: April 2, 2015 11:32 IST

बोल्ड दृष्यांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री सनी लिऑन आता सलमान खानची चाहती झाली आहे. मला सलमान खान म्हणून पुनर्जन्म घ्यायला आवडेल अशी इच्छा सनी लिऑनने व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २ - बोल्ड दृष्यांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री सनी लिऑन आता सलमान खानची चाहती झाली आहे. मला सलमान खान म्हणून पुनर्जन्म घ्यायला आवडेल अशी इच्छा सनी लिऑनने व्यक्त केली आहे. भारतीय संस्कृतीचा मी आदर करत असून भारतीय नियमांचे मी कधीही उल्लंघन करणार नाही असेही तिने म्हटले आहे. 
सनी लिऑनचा 'एक पहेली लीला' हा चित्रपट येत्या काही दिवसांमध्ये प्रदर्शित होत असून या सिनेमाच्या प्रोमोशन दरम्यान सनी लिऑनने 'मन की बात' सांगितली. सनीचा आगामी सिनेमा हा पुनर्जन्मावर आधारित असून यासंदर्भात तिला प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर सनी लिऑनने सलमान म्हणून पुनर्जन्म घ्यायला आवडेल असे सांगितले. याचे कारण सांगताना सनी म्हणते, सलमानला लोकं घाबरतांत पण त्याच्यावर प्रेमही करतात. सनी लियोन बिग बॉस या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाली होती व त्या शोनंतर सनी लियोनसाठी बॉलीवूडचे दरवाजे उघडले होते.