Join us

सैयमीला करायचेय बिग बीसोबत काम

By admin | Updated: October 3, 2016 02:34 IST

‘मिर्झिया’ चित्रपटाच्या माध्यमातून सैयमी खेर ही अभिनेता हर्षवर्धन कपूरसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे.

मुंबई- ‘मिर्झिया’ चित्रपटाच्या माध्यमातून सैयमी खेर ही अभिनेता हर्षवर्धन कपूरसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांना समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना ती म्हणाली, ‘मी अमिताभ बच्चन यांची खूप मोठी फॅन आहे. जेव्हा त्यांनी ‘मिर्झिया’ चित्रपटाबद्दल ट्विट केले तेव्हा मला प्रचंड आनंद झाला. त्या आनंदातून बाहेर यायला मला जवळपास 8 दिवस लागले. त्यांनी ट्रेलरचं कौतुक करणं हे माझ्यासाठी स्वप्नवतच आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला मी उत्सुक आहे.